श्री वासुदेव निवास, पुणे आणि श्रीविद्या उपासना महापीठम्, श्रीकरवीर, यांचे मार्गदर्शनामध्ये कार्यरत

श्रीविद्या-शक्तिपात महायोगाश्रम, कोल्हापूर

श्रीमहात्रिपुरसुंदरी ललिताम्बिका उपासना अंतर्गत श्रीविद्या आणि श्रीविद्यागुरु भगवान श्री दत्तात्रेय उपासना अंतर्गत श्रीगुरु प्रदत्त शक्तिपात योग साधकांची मातृसंस्था

संस्थेचा इतिहास, उद्दिष्टे आणि कार्यक्षेत्र

आजकाल लौकिक प्रलोभनांच्या, धकाधकीच्या जीवनात संपत्तीने अनेक सोयीसुविधा निर्माण केल्या आहेत, परंतु सौख्य समाधान पूर्ण नष्ट झाले आहे. प्रेम-सात्त्विकता-आस्था संपत चालली आहे. मनुष्य निराश व संवेदनाहीन बनत चालला आहे. यासाठी त्याला आपल्या अंतरंगातील उपस्याचे “आत्मारामाचे” सामर्थ्य उमजून व लाभ करून घेण्यासाठी अंतरंग ध्यान-साधनेच्या माध्यमातून परमशांती आणि स्थिरसुख लाभावे यासाठी श्रीविद्या-शक्तिपात महायोगाश्रम” विविध प्रकारे कार्यरत आहे.

सेवा, उपक्रम, देणगी करिता संपर्क

श्रीविद्या आणि शक्तिपात साधकांचे एकत्रीकरण आणि सामूहिक उपासना याकरिता आम्ही "श्री अनाघादत्तधाम" या भव्य प्रकल्पाची निर्मिती करण्याचे गुरुकार्य श्री जगदंबेच्या आणि श्री गुरुदेवांच्या कृपेने संकल्पित केले आहे. याकरिता सुमारे ३ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून सर्वाना आवाहन करण्यात येते कि या कार्यामध्ये यथाशक्ती दान करून गुरुसेवेचा लाभ करून घ्यावा. तसेच संस्थेतर्फे अनेक सेवा आणि उपक्रम वर्षभर साजरे केले जातात. विविध उपक्रमांबद्दल जाणून घेण्यासाठी आणि त्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपण अधिक माहितीकरिता येथे क्लीक करा...